फलटण प्रतिनिधी- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रविवार
दिनांक २८/०४/२०२४ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता फलटण तालुक्यातील सकल ओबीसी समाजाची बैठक फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील श्री. संत सावता माळी मंदिरामध्ये आयोजित केली असल्याची माहिती फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
तरी या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणूक व ओबीसी समाजाची पुढील वाटचाल यासंदर्भात विचार विनिमय करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला फलटण तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सदरची मीटिंग ही बरोबर सात वाजता सुरू होईल याची सर्व ओबीसी समाज बांधवांनी नोंद घ्यावी असेही यावेळी कळविण्यात आले आहे
Back to top button
कॉपी करू नका.