फलटण प्रतिनिधि- शहर उपजीविका केंद्र मार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा व कार्यपद्धती यांच्या माध्यमातून तसेच शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून स्वयं सहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले.

फलटण येथे दीनदया आमचे योजना राष्ट्रीय नागरिक अभियान अंतर्गत चिरैया शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी निखिल मोरे बोलत होते याप्रसंगी व्यवस्थापक शशिकांत शिरतोडे मोहनराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पुढे मोरे म्हणाले की फलटण शहरातील असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून शहर उपजीविका केंद्राच्या सेवांचा लाभ हेल्पलाइनच्या माध्यमातून शहरातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी मोरे यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी फलटण नगरपरिषदेच्या साळुंखे मॅडम (विद्युत अभियंता), साधना पवार मॅडम (आस्थापना), प्रकाश तुळसे (SI, आरोग्य) व मुश्ताक महात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शिला घाडग व्यवस्थापक, ओमसाई लोकसंचलीत साधन केंद्र फलटण (माविम), मालन गोडसे, अध्यक्षा,आत्मनिर्भर शहर स्तर संघ, फलटण, विद्या रिठे व सुप्रिया फडतरे (NULM सहयोगीनी) व वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष- सचिव, CRP व स्वयं सहाय्यता बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
Back to top button
कॉपी करू नका.