फलटण प्रतिनिधी- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये गुरुवार दिनांक 20 जून 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अक्षय सोनवलकर, दादासाहेब महानवर, पंकज सोनवलकर, सचिन लाळगे, भास्कर ढेकळे, संदेश कोळेकर, गणेश कोळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुढे म्हणतात की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळे अनेकांचे जीव वाचविले जातात अशा या पवित्र रक्तदाब कार्यक्रमांमध्ये फलटण तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने हजर राहून रक्तदान करावे असे आवाहन केले आहे रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून सदरचे रक्तदान कार्यक्रम फलटण येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आयोजित करण्यात आला असून शेकडो रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिर कार्यक्रमात सहभागी होऊन एक सामाजिक उपक्रम यशस्वी करावा असेही पत्रकार म्हटले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.