ताज्या घडामोडी
छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे व लोकाभिमुख राजे होऊन गेले – समाज कल्याण उपायुक्त नितीन उबाळे

फलटण प्रतिनिधी- छ. शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने जातीय व्यवस्था मोडीत काढून तत्कालीन परिस्थितीत आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देत असतानाच समाजामधील जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न करून आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये शिक्षण व्यवस्था गतिमान केली त्याचबरोबर शेती व सिंचन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून “झाडे लावा झाडे जगवा” हा मूलमंत्र छ. शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील रयतेला दिला छ. शाहू महाराज खऱ्या अर्थाने दिन-दलित वंचित व उपेक्षित वर्गाचे तारणहार होते. म्हणूनच ते लोकाभिमुख राजे बनले असे प्रतिपादन सातारा जिल्हा समाज कल्याण उपायुक्त नितीन उबाळे यांनी केले.
सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात छ. शाहू महाराज जन्मदिन आज सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उबाळे बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य यशवंत पाटणे, लेखाधिकारी पोपटराव कोकरे, व्याख्याते मिथुन माने सर, निरीक्षक श्रीकांत जगदाळे, मुकुंद गोरे, आस्था टाईम्सचे संपादक कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेवादल प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र लवंगारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते शंकरराव उमापे तसेच विविध पुरस्कार विजेते मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे उबाळे म्हणाले की, समाज कल्याण विभागाशी संबंधित जे जे विभाग आहेत या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी आपला कडे येणाऱ्या लाभार्थ्यांबरोबर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून राहून त्यांचे प्रामाणिक काम केले पाहिजे व लाभार्थ्यांना उचित लाभ कसा देता येईल असा प्रयत्न करणे गरजेचे असून पिडितांना न्याय देण्यासाठी खरंतर आपण सर्वांनी कष्टाची पराकाष्टा गरजेचे असून पुढे ते म्हणतात
छ. शाहू महाराज यांनी राजा म्हणून काम करत असताना खूप दूरदृष्टी समोर ठेवून समाजाच्या सगळ्या क्षेत्रावर प्रभाव टाकण्याचे काम केले असल्यामुळे छ. शाहू महाराजांचा जन्मदिन हा एक मोठा उत्सव म्हणून व न्याय दिवस म्हणून आपण साजरा करीत असतो असेही शेवटी सातारा समाज कल्याण उपायुक्त नितीन उबाळे यांनी मांडले.
याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत यशवंत पाटणे व्याख्याते मिथुन माने सर यांनी ही आपले विचार व्यक्त केले. श्री काळे साहेब यांनी छत्रपती शाहू महाराजांचा वेशभूषा परिधान करून सर्व उपस्थित यांचे लक्ष वेधून घेतले होते.
छत्रपती शाहू महाराजांच्या