फलटण प्रतिनिधी- फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कल्पक व कार्यकुशल सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये बजावली होती. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजयाचा मार्ग सुखकर झाला होता हे प्रत्यक्षात मोहिते पाटील यांनी आपल्या विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये कबूल केले होते.
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार दीपक चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण तालुका दुध पुरवठा संघाचे चेअरमन प्राध्यापक भीमदेव बुरुंगले सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, फलटण पंचायत समिती माजी सभापती तसेच मार्केट कमिटीचे सर्व संचालक व अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज इत्यादी सह अनेक मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.