(फलटण/प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा(पूर्व)शाखा फलटण तालुका यांच्या वतीने एकूण ४० बौद्ध उपासक – उपासिका व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दि. 19 व 20 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे प्रचार व पर्यटन विभाग शाखा फलटण तालुका यांच्या वतीने धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी ‘धम्माचल’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम अजिंठा लेणी फर्दापुर ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम धम्माचल चे सभासद भंते बोधिधम्मा यांनी सर्व बौद्ध उपासक उपासिका व पदाधिकाऱ्यांना त्रिसरण पंचशील दिले. सर्वांनी तिथे भेट दिली. त्यांच्या धम्म कार्याला शुभेच्छा दिल्या.
जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेल्या अजंठा लेण्यांना भेट देऊन महायान आणि हीनयान परंपरेतील बौद्ध लेण्यांचा इतिहास, कलात्मकता व धम्म संदेश समजून घेतला. या ऐतिहासिक स्थळाने बौद्ध धर्माच्या महान परंपरेची पुनः प्रत्ययाने आठवण करून दिली. अजंठा लेणी इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून ते इ.स. सहाव्या शतकापर्यंत या लेण्या कोरल्या गेल्या. एकूण ३० लेण्या आहेत. त्यापैकी काही हीनयान (प्रारंभीची परंपरा) आणि काही महायान (उत्तरकालीन परंपरा) शैलीतील आहेत. हीनयान परंपरेतील लेणींमध्ये बुद्धाची प्रतिमा नसून धम्मचक्र, कमळ, रिकामा सिंहासन, बोधिवृक्ष अशा प्रतीकांद्वारे बुद्धत्वाचे दर्शन घडते.या काळातील लेण्या साध्या, ध्यानमय आणि साधना केंद्रित आहेत.महायान परंपरेतील लेणींमध्ये बुद्धाची मूर्ती, बोधिसत्वांची शिल्पे व भित्तिचित्रे दिसतात.
या काळात बुद्ध मानवी रूपात दाखवले जातात. लेणी क्रमांक १, २, १६, १७, १९ आणि २६ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांमध्ये जगताचा त्याग, ज्ञानप्राप्ती, करुणा व प्रज्ञेचा संदेश दिसतो. भित्तिचित्रांमध्ये जातक कथा, बुद्धांचे जीवन प्रसंग, तसेच समाजजीवनाचे सुंदर दर्शन घडले. या चित्रांतून भारतीय कला, अध्यात्म आणि मानवी मूल्यांची गहन सांगड दिसून येते.
पूज्य भिक्खू करुणानंद यांचा ‘महाथेरो’ समारंभ तसेच कठिण ‘चिवरदान’ धम्म सोहळ्यास उपस्थित राहून हा संपूर्ण सोहळा पाहिला. यावेळी पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात येण्याची भावना व्यक्त केली. त्यांनी सर्व तालुक्यातील पदाधिकारी व उपासक-उपासिका यांना आशीर्वाद दिले. सर्वांच्या प्रति मंगल मैत्रीची भावना व्यक्त केली. लवकरच सातारा जिल्ह्यामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांना शुभेच्छा दिल्या व यावेळी बोलताना त्यांनी बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासंदर्भात आपली भूमिका मांडली. संपूर्ण देशभर सुरू असणाऱ्या आंदोलनाविषयी व धम्मकार्याविषयी त्यांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची भावना व्यक्त केली.
दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी वेरूळ येथील लेण्यांना भेट देऊन बौद्ध, जैन आणि हिंदू परंपरेतील अद्भुत शिल्पकलेचा संगम अनुभवला. धम्म, कला आणि इतिहास यांचा अनोखा मिलाफ येथे दिसून आला. बौद्ध आणि कैलास लेणी भारतीय वारशाचे दोन अद्भुत अध्याय सर्व पदाधिकारी व उपासक – उपासिका यांनी औरंगाबाद येथील एलोरा लेणी परिसरात भेट देऊन धम्म, कला व इतिहासाचा थेट अनुभव घेतला. वेरूळ येथील लेणी क्र 16 कैलास लेणी व एकूण १२ बौद्ध लेण्या (१–१२ क्रमांक) विहार व चैत्यगृह स्वरूपात पहायला मिळाले. महायान परंपरेचे दर्शन, ध्यानस्थ बुद्ध, बोधिसत्त्वांच्या मूर्ती. विशेष प्रसिद्ध असलेली विश्वकर्मा लेणी (लेणी क्र. १०)लाकडी तुळईसारखी छताची नक्षी आणि ध्यानस्थ बुद्धमूर्ती. संघजीवनाचे दर्शन, अभ्यास, ध्यान व उपासनेसाठी रचना प्रत्यक्ष पाहण्यासाठी यावेळी इ.स.५व्या ते ७व्या शतकातील कलात्मक वारसा पाहण्याची संधी या धम्म सहलीच्या माध्यमातून मिळाली. यावेळी प्रसिद्ध असलेल्या लेणी क्र. 10 ‘विश्वकर्मा लेणी’ म्हणून ओळखले जाते. या लेणीमध्ये त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा, भिमस्मरण, भीम स्तुती सामुदायिक रित्या भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या पदाधिकारी व बौद्ध उपासक उपासिका यांनी घेतली. यावेळी थाई भिक्खू यांना वंदन केले.
बिबी का मकबरा हे एक सुंदर ऐतिहासिक स्मारक आहे. याला “दख्खनचा ताजमहल” असेही म्हटले जाते.याला भेट देण्यात आली.
धम्म सहलीच्या निमित्ताने सर्व पदाधिकारी, उपासक – उपासिका यांनी आज छ. संभाजी नगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी निगडित ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रवेश कमान : या कमानी खाली उभं राहून सर्वांनी विद्यापीठाच्या नामांतर लढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेतली. हा लढा आंबेडकर विचारांवरील श्रद्धेचा आणि सामाजिक न्यायाचा प्रतीक ठरला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व स्मारक : येथे सर्वांनी नमन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. स्मारकातील छायाचित्रे व माहिती फलकातून त्यांच्या शिक्षण, संघर्ष आणि संविधान निर्मितीतील योगदान समजावून घेतले.
मिलिंद महाविद्यालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाला भेट दिली. हे शैक्षणिक संस्थान प्रत्यक्ष पाहून सर्वांनी “शिक्षण हेच खरे शस्त्र” या संदेशाची प्रेरणा घेतली.
नागसेन वन : या बौद्ध पवित्र स्थळी सर्वांनी शांत वातावरणात त्रिसरण – पंचशील घेत ध्यान केले व बुद्ध, धम्म आणि संघ यांना अभिवादन केले. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते लावण्यात आलेल्या बोधिवृक्षालाही वंदन केले. त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेल्या बुद्ध रूपाची माहिती संकलित केली व बुद्धरुपाला पंचांग प्रणाम करून वंदन केले. या संपूर्ण भेटीद्वारे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक – उपासिका यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, बौद्ध संस्कृतीचे वारसास्थळ आणि शिक्षण – धम्म यांची प्रेरणा अनुभवली.
या धम्म सहलीतील प्रमुख उपस्थिती आयु. दादासाहेब भोसले साहेब – राज्य संघटक व पुणे-सातारा प्रभारी, समता सैनिक दल असिस्टंट स्टाफ ऑफिसर, आयु. महावीर भालेराव सर तालुकाध्यक्ष, भा.बौ.म. फलटण, आयु. बाबासाहेब जगताप सर, महासचिव, भा.बौ.म. शाखा फलटण, आयु. विठ्ठल निकाळजे सर – कोषाध्यक्ष, भा.बौ.म. शाखा फलटण, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, संस्कार सचिव आयु.बजीरंग गायकवाड सर, आयु.अमोल भोसले सर, प्रचार पर्यटन सचिव आयु.अमोल काकडे, बौद्ध उपासक रमेश भोसले, तालुका संघटक आयु.अरविंद निकाळजे सर, माण तालुका भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आयु.आबा भोसले, धम्म उपासक अजय निकाळजे, कनिष्क घोरपडे, उपासिका चित्राताई गायकवाड मॅडम, सुवर्णप्रभा महादेव मोरे मॅडम,आयुनी कल्पना भालेराव मॅडम, आयुनी पारिजातका जगताप मॅडम, आयुनी विशाखा कीर्तावडे मॅडम, आयुनी अश्विनी मोरे मॅडम, आयुनी भाग्यश्री गायकवाड मॅडम, आयुनी उमिता अमोल भोसले,आयुनी सुषमा रमेश भोसले, प्रतिक अमोल भोसले,अनुष्का अमोल भोसले, रोनित रमेश भोसले, आयुनी योगिता घोरपडे, अंजली भोसले, समिधा घोरपडे, निलाक्षी जगताप, तनिष्का जगताप, आयुष गायकवाड, आरोही गायकवाड, आरोही मोरे, अपेक्षा मोरे, अनुष्का भोसले, रोनित भोसले,ज्योती अमोल काकडे, श्रुती अमोल काकडे, हर्षवर्धन अमोल काकडे सर्व पदाधिकारी व उपासक – उपासिका – भा.बौ.म. शाखा फलटण या धम्म सहलीत इतिहास, कला आणि करुणा यांचा संगम अनुभवताना सर्वांनी बुद्ध वचनांचे महत्त्व पुन्हा जाणले.या धम्म सहलीस भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयुष्यमान नानासो मोहिते सर यांनी शुभेच्छा दिल्या.
Back to top button