फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – नुकतेच सातारा जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार देखील सांभाळला आहे. आज दिनांक २३/०५/२०२५ रोजी सातारा शहर येथे मासिक गुन्हे आढावा बैठक निमित्ताने मा. श्री तुषार दोषी, यांचे फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, फलटण तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
याप्रसंगी फलटण उपविभागातील फलटण शहर, फलटण ग्रामीण,
शिरवळ, खंडाळा आणि लोणंद पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.
एसपी तुषार दोशी हे मूळचे महाड जिल्हा रायगड येथील आहेत. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून त्यांनी बी.एस्सी. पूर्ण केली आहे. त्यांची २००० साली पोलिस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. नाशिक येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. पहिली पोस्टींग चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे नक्षली प्रभाव असलेल्या ठिकाणी झाली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, जालना येथे कर्तव्य बजावले आहे.
तुषार दोशी यांना २०१४ साली आयपीएस केडर मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पुणे एटीएस, जालना, रेल्वे पुणे येथे कर्तव्य बजावले आहे. दरम्यान, नवी मुंबई क्राईमचे डीसीपी असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला आहे. सातार्यात त्यांच्या पुढे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्ह्यांचा छडा लावणे. पुसेसावळी सारखे जातीय तेढ निर्माण होणार नाहीत यासाठी प्रयत्न, पोलिस कर्मचार्यांना पोलिस वसाहतीचा लाभ कसा देता येईल, पोलिस कर्मचार्यांच्या पारदर्शी बदल्या, अशी आव्हाने राहणार आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.