फलटण प्रतिनिधी- श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटण एसएससी या प्रशालीतील जिजाई नंदराम निकम आणि निधी प्रशांत यादव या दोन विद्यार्थ्यांनी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून उज्वल यश प्राप्त केले आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्या संध्या फाळके, अनुराधा रणवरे आणि विद्यालयातील शिक्षक आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार संस्थेचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह ना. निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह ना. निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे विजयसिंह ना. निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद सखाराम निकम, प्रचार्या संध्या फाळके, सुपरवायझर महेश निंबाळकर, शिक्षक शिक्षिका आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.