फलटण प्रतिनिधी- फलटण शहरात असणारे मोकाट जनावरे आणी विशेषतः मोकाट कुत्र्यानं मुळे शाळेकरी लहान लहान मुले महिला पुरुषांना या मोकाट कुत्र्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तरी फलटण नगर पालिकेने या मोकाट जानवरांचा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या मधून होत आहे.
शहरात चौका चौकात शेकडो मोकाट कुत्री रस्त्यात बसून उच्छाद मांडत असताना त्यांना पकडण्याची सक्षम यंत्रणा नगरपालिकेकडे नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. तसेच मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी हि नगरपालिकेकडे सक्षम यंत्रणा व ठेकेदार नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असताना दिसून येत आहे.
तरी फलटण नगर परिषदेने या मोकाट कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या मधून होताना दिसून येत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.