ताज्या घडामोडी

जिंती नाका येथील उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण पुतळा परीसराचे सुशोभीकरण करा- शहराध्यक्ष पंकज पवार

फलटण नगर परिषदेला थोर पुरुषाचे विस्मरण

फलटण प्रतिनिधी- फलटण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या जिंती नाका येथे थोर स्वातंत्र्य सैनिक तथा देशाचे माजी उपपंतप्रधान सातारा जिल्ह्याची अस्मिता व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी स्व.वेणुताई चव्हाण यांचा संयुक्त पुतळा असून सदर पुतळा व सभोवताली असणाऱ्या संरक्षक भिंतीची पडझड होऊन दुरावस्था झालेली आहे. हि दुरावस्था थांबवून स्मारकाचे ताबडतोब सुशोभीकरण करण्यात यावे तसेच शहरातील अनेक प्रश्नावर नगर परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष पंकज पवार यांनी केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात ते म्हणतात की, राष्ट्रीय काँग्रेस फलटणच्या वतीने प्रशासनास अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून निवेदने दिलेली आहेत. वास्तविक फलटण हे स्व.वेणुताई चव्हाण यांचे माहेर असून समस्त फलटण वासियांना याचा अभिमान आहे.
12 मार्च 2025 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांची जयंती असते यावेळी फलटण तालुक्यातील अनेक संस्था, नागरिक साहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात,त्यावेळी स्मारक परिसराची झालेली पडझड तसेच तेथे असलेला कचरा व गुटखा व मद्याच्या रिकाम्या बाटल्या यामुळे
सदर स्मारकाची दुरावस्था पाहून सर्वांचे मन व्यथित होते.
वरील सर्व परीस्थिती पाहता आपण याची दखल घ्यावी व सदर स्मारकाची व संरक्षक भिंतीचे तातडीने सुशोभीकरण करावे.
तसेच

फलटण शहरातून होणाऱ्या वाहतुकीचे वाढते प्रमाण पाहता बारामती पुल ते श्रीराम कारखाना मार्गे मार्केट यार्ड कडे जाणारा रस्त्याचा वापर होणे साठी वाहतूक वळवणे आवश्यक आहे.

क्रां. नाना पाटील चौक येथे सिग्नल यंत्रणा बसवलेली आहे मात्र ती अनेक वर्षे बंद अवस्थेत असल्याने रोजच वाहतूकीची कोंडी होत असते,त्यातच काही अवजड वाहने चुकिच्या बाजूने वळण घेत असतात यातच एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे,यामुळे तातडीने सिग्नल यंत्रणा चालू करावी.

शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर नवीन व्यापारी संकुल झालेली असून सदर व्यापारी संकुलात पार्किंग नाही,त्यामुळे तेथील दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावर आपली वाहने उभी करतात यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी.
तसेच फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून फलटणकर नागरिकांना सुविधा मिळणेबाबत संबंधित विभागांना आपल्या माध्यमातून योग्य सुचना द्याव्यात असे निवेदनात शेवटी म्हंटले आहे.

राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी डॉ.श्री. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय काँग्रेस चे तालुकाध्यक्ष श्री. महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या सुचनेनुसार फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष श्री. पंकज पवार यांनी फलटण नगरपरिषद चे उपमुख्याधिकारी श्री. तेजस पाटील यांना दिले याप्रसंगी जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री. शंकरराव लोखंडे व फलटण शहर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष श्री. अल्ताफ पठाण उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.