ताज्या घडामोडी

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते शेंडे दाताचा दवाखाना क्लिनिकचे स्थलांतर व विस्तारीकरण शुभारंभ

फलटण प्रतिनिधी- गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेंडे दाताचा दवाखाना क्लिनिकचे स्थलांतर व विस्तारीकरण शुभारंभ रविवार दिनांक ३0/३/२५ रोजी दुपारी ३ वाजता डॉ. सोनवणे हॉस्पिटलच्या मागे रिंग रोड लक्ष्मी नगर फलटण येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती डॉ.किरण शेंडे यांनी दिली आहे.

यावेळी अधिकची माहिती देताना डॉ. किरण शेंडे म्हणाले की, याप्रसंगी फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे ना. निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून फलटण तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र बीचुकले डॉक्टर तेजस्विनी देशपांडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगून डॉ. किरण शेंडे म्हणतात की, डॉ. शेंडे दातांचा दवाखाना यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व सामग्री सह प्रशस्त व सुसज्ज इमारतीमध्ये सदर दवाखान्याचे स्थलांतर होणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे असे आवाहन  मा. डॉ. उत्तमराव शेंडे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. उत्तमराव शेंडे,  पंचायत समितीच्या माजी सदस्या तथा डॉ. विजयमाला शेंडे, डॉ. किरण शेंडे व डॉ. काजल शेंडे यांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.