ताज्या घडामोडी
राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे साधेपणाने आगमन
मंडळाचे माजी अध्यक्ष तथा फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.बाबुराव गावडे यांना मंडळाने वाहिली आदरांजली

फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण शहरातील महत्त्वाचं मानलं जाणार गणेशोत्सव मंडळ म्हणजे राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ यंदा या मंडळाने आपल्या गणरायाचे आगमन साधेपणाने केले आहे. कारण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.बाबुराव गावडे यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असल्यामुळे यंदाच्या वर्षी गणरायाचे आगमन साधेपणाने करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ मदने व उपाध्यक्ष शाहूजी मदने यांनी दिली.



