फलटण प्रतिनिधी- ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो या भावनेतून फलटण लायस क्लबचे अध्यक्ष लायन जगदीश करवा यांचे नेहमीच आचरण राहिले आहे. ते फलटणमधील एक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून या व्यवसायाबरोबरच समाजातील गोरगरीब लोकांना मदत करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. याच भावनेतून फलटण लायन्स क्लब यांच्या माध्यमातून लायन्स आय हॉस्पिटल चालवण्यात येते. या आय हॉस्पिटलची ला. जगदीश करवा यांनी दिलेल्या दहा गुंठे जाग्यामध्ये मोठी सुसज्ज इमारत उभी आहे. या इमारतीसाठी लागणारी दहा गुंठे जागा यापूर्वी त्यांनी दान केली होती. पुन्हा आता नव्याने त्यांनी या आय हॉस्पिटलसाठी १० गुंठे जागा दान करून समाजातील लोकांच्या पुढे एक आगळे वेगळे दातृत्व ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे दातृत्व निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिपादन लायन आय हॉस्पिटलचे चेअरमन ला. अर्जुन घाडगे यांनी केले आहे.

नुकताच काही दिवसांपूर्वी या १० गुंठ्याचा दस्त सहाय्यक निबंध संस्था फलटण या ठिकाणी नोंदविण्यात आला. या दस्ताच्या प्रती सहाय्यक निबंधक श्री. पवार यांच्या हस्ते जगदीश करवा यांनी लायन क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला या कार्यक्रमात लायन अर्जुन घाडगे बोलत होते.
यावेळी माजी प्रांतपाल ला. भोजराज ना. निंबाळकर, लायन आय हॉस्पिटलचे सेक्रेटरी ला.चंद्रकांत कदम, ला. सुहास निकम, ला. रणजीत निंबाळकर, फलटण लायन्स क्लबचे सेक्रेटरी ला. महेश साळुंखे, ला. रतनसीभाई पटेल इत्यादी मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे ला.अर्जुन घाडगे म्हणाले की, लायन जगदीश करवा हे यंदाच्या वर्षी फलटण लायन्स क्लबचे अध्यक्ष असून त्यांच्या कार्य काळामध्ये अनेक सेवाभावी व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लायन जगदीश करवा यांनी कोट्यावधी रुपयाची ही जागा लायन आय हॉस्पिटलला दान केली असून समाजातील अनेक गरजू गोरगरीब लोकांना अनेक सेवाभावी संस्थांना ते नेहमी मदतीचा हात देत असतात त्यांच्यामध्ये असणारे दातृत्व हे खरोखरच वाखणण्यासारखे असून करवा नेहमी म्हणतात की आपणाला गरजेपेक्षा जास्त पैसे मिळाले तर त्यातील काही पैसे एक विश्वस्ताप्रमाणे समाजातील गरजू लोकांना देणे हे माझे कर्तव्य समजतो आणि याच भावनेतून माझ्या परीने मला जेवढं शक्य असेल तेवढे मी मदत करण्याचा प्रयत्न करीत असतो अशी भावना नेहमीच लायन जगदीश करवा यांनी ठेवली असल्याचे हि शेवटी लायन अर्जुन घाडगे म्हणाले.
Back to top button
कॉपी करू नका.