फलटण प्रतिनिधी- फलटण येथील संजय जाधव सर संचलित आकांक्षा क्लासेसच्याइयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच नवलबाई मंगल कार्यालयात उत्साही वातावरणात पार पडला.
प्रारंभि आकांक्षा क्लासेस चे संचालक श्री संजय जाधव व सौ जाधव मॅडम यांनी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आकांक्षा क्लासेस चे संचालक संजय जाधव यांनी आजपर्यंतच्या आपल्या का क्लासेसच्या प्रगतीचा आढावा सादर केला व भविष्यात लवकरच अकॅडमी सुरू करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, वन अधिकारी राहुल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दादासाहेब चोरमले म्हणाले की, या संगणकीय युगामध्ये हे जग खूप धावपळीचे व स्पर्धात्मक युग असून या युगात व या स्पर्धेत टिकून राहावयाची असेल तर विद्यार्थ्यांच्या मध्ये जिद्द चिकाटी सातत्य व संघर्ष करण्याची तयारी असावीच लागेल तरच भविष्यात तुमचा या स्पर्धात्मक युगात टिकाव लागणार असल्याचे सांगून मुलाने सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते ध्येय गाठताना ज्याप्रमाणे आपण नववीच्या दहावीच्या वर्गामध्ये भूमिती विषयाची सिद्धता सिद्ध करताना स्टेप बाय स्टेप जातो त्याचप्रमाणे आपण ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी कृतीयुक्त कार्यक्रम करणे गरजेचे असल्याचे माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून दिली.
तसेच राहुल निकम यांनी स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आणि पर्यावरण, संवर्धन काळाची गरज असल्याचे सांगून याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध कविताच्या आणि गोष्टीच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात संस्कार आणि जिद्द किती महत्त्वाचे असतात याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सर्व नियोजन आणि सूत्रसंचालन आकांक्षा क्लासेसच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केलेले होते.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम छान पद्धतीने पार पाडला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आकांक्षा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम सादर केला.