ताज्या घडामोडी
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पुणे येथे छ. शिवराय महाराज महाराणी सईबाई श्रीमंत निंबाळकर घराणे स्वराज्य रथ सोहळ्याचे आयोजन

फलटण प्रतिनिधी- छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज, महाराणी सईबाई श्रीमंत निंबाळकर घराणे स्वराज्य रथ सोहळ्याचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले तसेच श्रीमंत सईबाई महाराज यांचे व वंशज श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर केंद्रीय मंत्री मोहोळ इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

मिरवणुकीच्या प्रारंभी रथामधील छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई महाराज यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.



