फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा- आज मुंबई मंत्रालय येथे झालेल्या २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण काढण्यात आले यामध्ये प्रामुख्याने फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच सर्वसाधारण झाले आहे.
यामुळे फलटणच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक अटीतटीची लढली जाणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. गेली ३० वर्षे फलटण नगरपरिषदेवर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्याच विचाराचा नगराध्यक्ष राहिलेला आहे.
राजे गटाकडून आता श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांचे चिरंजीव युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे ना. निंबाळकर यांना थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी त उतरवले जावू शकते. तर विरोधी भारतीय जनता पक्षाकडून माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर हे त्यांचे मोठे बंधु व नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक समशेरसिंह हिंदुराव ना. निंबाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात मग अशी निवडणूक झाली तर निश्चितच फलटणकरांना चांगली व रंगतदार निवडणूक पहावयास मिळेल हे मात्र नक्की.
Back to top button