ताज्या घडामोडी
बरड ते मिरढे,जावली,आदरुंड रास्ता बनलांय मृत्यूचा सापळा ; प्रशासनाचे दुर्लक्ष
साईट पट्टया खचल्याने डब्बल वाहणं बसणं होतंय अवघड

(जावली/अजिंक्य आढाव)- सध्या श्रावण महिना समाप्त होत चालला तरी शिंगणापूरची गर्दी हटेना भाविकांची अलोट गर्दी या वर्ष पाहिला मिळाली, महादेव डोंगर रांगेत महाराष्ट्र कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी करतात यातच शिखर शिंगणापूर कडे मोठी गर्दी होत आहे अशातच बांधकाम विभागा कडून जाणुन बुजुन दुर्लक्ष केले जाते असल्याचे नागरिकांमधुन बोलले जात आहे.

बरड ते मिरढे रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यावर मुरुमीकरण करण्यात आले होते परंतु रोडवरील मोठमोठ्या चारी मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, काही शालेय, शासकीय कर्मचारी माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर, आदंरुड,व शालेय विद्यार्थां या भागातुन प्रवास करत असतात मात्र मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे अतिशय खराब झाल्याने रस्त्याच्या कामकाज बाबतीत शंका निर्माण केले जाते आहे.रोडवरील खड्डे दिड फुट खोल व संपूर्ण रस्त्यावर खडी वाहुन गेल्याने दुचाकीस्वारांची तर दयना उडत आहे,तर नवख्या चालकांकडून खड्डे चुकवताना अपघात समोरे जावं लागतं आहे.
