सातारा दि. 19- सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अंदाज दिल्याने पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड या तालुक्यातील बुधवार 20 ऑगस्ट व गुरुवार 21 ऑगस्ट रोजी सर्व प्राथमिक शाळा बंद राहतील, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या.
तसेच कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यातील पर्जन्याची स्थिती पाहून तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा, शाळा सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षित रहावेत यासाठी पालकांनी दक्ष रहावे, असेही आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.