आपला जिल्हा

फलटण ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कारवाई ; धुमाळवाडी धबधब्यावरील पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीतील ३ आरोपी अवघ्या ८ तासात पकडले !

आणखी ७ आरोपी फरारी

(जावली/अजिंक्य आढाव) फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील नयनरम्य धबधबा अलीकडील काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे त्यामुळे त्या ठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे दि 8 जुलै रोजी सायंकाळी 5 सुमारास धुमळवाडी येथील धबधबा पाहून पर्यटक आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले असताना वारुगडच्या टेकडीवरून टेहळणी करणारे एकूण १० इसमांनी महिल पर्यटकांना हेरुन 200 मीटर अंतरावर गाठून त्यांना लाकडी दंड किंवा लोखंडी सूर्याचा भाग दाखवून लुटमार केली आहे यामध्ये पर्यटक महिलांच्या गळ्यातील सोन्याची चांदीचे दागिने व पर्यटक पुरुषाकडे मनगटी घड्याळ पैसे असे एकूण 5 लाख 45 हजार रुपये किमतीचा माल  जबरदस्तीने चोरून नेली ची घटना घडली हे पीडित महिला ह्या मदतीसाठी मोठमोठ्या ने ओरडून आर्जव करीत असतानाच सदर घटनेची माहिती धुमाळवाडी गावचे पोलीस पाटील सौ. पल्लवी शरद पवार यांना मिळाली त्यांनी प्रसंगावधान ओळखून लगेचच फलटण ग्रामीण पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस स्टाफ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सदर गुन्ह्याचे घटनास्थळी वारूळ डोंगराच्या पायथ्याला डोंगर कपारी मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तत्काळ पोहोचणे शक्य नव्हते परंतु पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपला अनुभव कसब पणाला लावून केवळ पीडित महिलांनी संशयितांबाबत सांगितलेल्या तुटपुंज्या वर्णानावरुन सुमारे १० कि‌ मी ओढ्यानाल्यातुन ,दगडधोडंयातुन व डोंगरदरीतुन अंधारामधे सुमारे 06 तास पाठलाग करुन 3 संशयित इसमांना पकडले असुन त्यांची नावे.१)दिपक नामदेव मसुगडे ,वय 30 रा नवलेवाडी – मलवडी, ता माण
२)विलास उर्फ बाबू दत्तात्रय गुजले व 21 रा .खांडज तालुका बारामती जिल्हा पुणे ३) चेतन शंकर लांडगे वय 25 रा सोनगाव बंगला ता फलटण जि सातारा अशी सदर संशयित आरोपींनी गुन्हयाची कबुली देऊन गुन्हा करताना वापरलेला चाकु व बजाज पल्सर मोटार सायकल काढून दिल्यामुळे ती जप्त करण्यात आली आहेत.

सदर गुन्ह्यांमध्ये वरील अटक आरोपींनी व्यतिरिक्त रणजित कैलास भंडलकर ,तानाजी नाथाबा लोखंडे रा.खामगाव ता.फलटण जि सातारा,अक्षय महादेव चव्हाण रा.शिरोली ता बारामती, जि.पुणे वैभव सतीश जाधव, राम शंकर जाधव, सुरज कैलास जाधव रा. मलवडी ता. माण जि सातारा यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा सहभाग निष्पन्न झाला.
सदरचे संशयित आरोपीं हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा ,जबरी चोरी, गर्दी मारामारी गंभीर गुन्हे यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहे.

वडकी कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. तुषार जोशी सो अप्पर पोलीस अधीक्षक मा.वैशाली कडुकर मॅडम , उपविभागीय पोलिस अधिकारी मा.राहुल धस सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वात दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उप निरीक्षक गोपाल बदने पोलिस अंमलदार वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे , अमोल जगदाळे, हणमंत दडस , तुषार नलवडे, कल्पेश काशीद, नितीन धुमाळ, निलेश कुदळे,अक्षय खाडे यांनी सहभाग घेतला होता.या मधे धुमाळवाडी गावचे नागरिक शरद पवार यांनी फलटण ग्रामीण पोलीसांशी सुसंवाद साधून घटनेची अचूक माहिती दिली.

सदर गु.र.नं 510/2025भा.न्या.सं.2023चे कलम 310(2) अन्वये गुन्हा नोंद असुन त्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.