ताज्या घडामोडी
फलटण-दहिवडी रस्ता कामात शेतकऱ्यांवर अन्याय; श्रीमंत रामराजे यांची जिल्हाधिकाऱ्याबरोबर चर्चा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबर चर्चा करून तोडगा काढणार - श्रीमंत रामराजे

फलटण, आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण-दहिवडी मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. यासंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.




