फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – कोळकी जि प गटातील राजे गटाचे युवा नेते मोहनराव साहेबराव डांगे यांची फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली आहे.
नुकतीच फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ रोजी संपन्न होणार आहे. या सभे पूर्वी ही निवड करण्यात आली आहे. याची माहिती फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी युवा नेते मोहनराव साहेबराव डांगे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
मोहनराव डांगे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण संस्थांचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटणचे माजी आमदार दिपकराव चव्हाण, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, सचिव शंकराव सोनवलकर, तसेच सर्व संचालक यांनीही अभिनंदन केले आहे.
Back to top button