ताज्या घडामोडी

नवरात्र विजयादशमी देवीच्या मिरवणुक रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी – जिल्हाधिकारी यांनी काढला आदेश

आस्था टाईम्स वृत्तसेवा – नवरात्र विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी देवीच्या मिरवणूक दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत मर्यादित आवाजामध्ये घालून दिलेल्या नियमानुसार ध्वनीची मर्यादा राखून मिरवणुकीस परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काढले आहे.

नुकताच गणेशोत्सव पार पडला यावेळी गणेश विसर्जन मिरवणूकीत अनेक मंडळांनी ध्वनीची मर्यादा ओलांडली होती व अमर्याद डी.जे. वाजताना आढळून आले. त्यांच्यावर कोणती कारवाई केली हे अद्याप पर्यंत समजले नाही. श्री दुर्गा विसर्जन मिरवणूकीत निश्चितपणे ध्वनीची मर्यादा सर्व मंडळे पाळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button