फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना काढली त्यातील ही मोठी घोषणा देऊन सांगितलं की आम्ही केवळ लाडकी बहीण योजनाच नव्हे तर लाडक्या भावांसाठीही युवा प्रशिक्षणार्थीं योजना राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात देणार त्याप्रमाणे लाडका भाऊ योजना प्रशिक्षण म्हणून आम्हाला सहा महिने रोजगार दिला सहा महिन्यानंतर पाच महिने कालावधी वाढ दिले पण प्रशिक्षण झाले मात्र रोजगार नाही आता अकरा महिने पूर्ण कार्यकाळ आमचा झाला पण आता आम्हाला आहे हे सरकार घरचा रस्ता दाखवत आहे तरी युवा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सातारा जिल्हा प्रतिनिधी हिना पानसरे यांनी खासदार छ. उदयनराजे भोसले व श्रीमंत महाराणी सौ. दमयंती राजे भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा प्रतिनिधी हिना पानसरे पुढे निवेदनामध्ये म्हणतात की,
सर्व आस्थापनेतील प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थींच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की, आम्ही 11 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या प्रशिक्षणाचा करायचं काय जे प्रमाणपत्र मिळणार त्याचा फायदा काय महाराष्ट्रभरातून एक लाख 34 हजार प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण घेतले असून सातारा जिल्ह्यातून लगबग साडेतीन ते चार हजार प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले आहे.
पण आता सर्वांना ज्या त्या आस्थापनेतून कार्यमुक्त करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधी असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभर प्रशिक्षणार्थींची विविध आंदोलन, उपोषण चालू आहेत तरी या प्रश्नाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी लक्ष घालावे अशीही मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये खालील मागण्या देण्यात आल्या आहेत.
१) शासकीय आस्थापनेत आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा
२) नियमित वेळेवर विद्यावेतन व रोजगार उपलब्ध नंतर पगार मिळावा
३) प्रशिक्षणार्थींचे चार ते पाच महिन्यांचे विद्यावेतन थकित आहे विद्यावेतन लवकरात लवकर प्रशिक्षणार्थींना देण्यात यावे
वरील मागण्यांचे निवेदन देताना सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते अशी ही माहिती शेवटी हे नाव पानसरे यांनी दिली आहे.
कराड तालुका अश्विनी माने, जावली तालुका सुप्रिया पाडळे, पाटण तालुका माधव देशपांडे, फलटण तालुका आकाश गोळे, वाई तालुका प्रथमेश अमराळे, महाबळेश्वर तालुका रेखा खामकर, माण जिल्हा तालुका प्रशांत भोसले, कोरेगाव तालुका रेशमा नलवडे, खंडाळा तालुका करिष्मा बनकर, खटाव तालुका विष्णू काळे, सातारा तालुका अश्विनी खुडे हे सर्व तालुक्यातील हे युवा कार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
Back to top button