फलटण :आस्था टाइम्स वृत्तसेवा- फलटण तालुक्यातील दुधेबावी गावचे सुपुत्र आणि माण तालुक्यात कार्यरत असणारी सहाय्यक कृषि अधिकारी नितीन सोनवलकर यांची राज्याचे कृषिमंत्री मा.ना. दत्तामामा भरणे यांच्या शासकीय स्वीय सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना शाखा फलटण आणि उप कृषि अधिकारी संघटना शाखा फलटण कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोनवलकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मा. सुहास रणसिंग तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय फलटण,मा.श्री. दत्तात्रय एकळ मंडळ कृषि अधिकारी तरडगाव, मा. श्री. शहाजी शिंदे, मंडळ कृषि अधिकारी विडणी, अजित जगताप मंडळ कृषि अधिकारी फलटण, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हा.चेअरमन शशिकांत सोनवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन डांगे, मा मार्केट कमिटीचे सचिव श्री शंकरराव सोनवलकर,अशोक जगदाळे, मा श्री अमित रणवरे, महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना शाखा फलटण, श्री कुलदिप नेवसे साहेब जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना सातारा, मा श्री विलास काळे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना सातारा, मा श्री शंकरराव सस्ते मार्गदर्शक सहाय्यक कृषि अधिकारी संघटना सातारा , सर्व उप कृषि अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी, व कर्मचारी इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
Back to top button