ताज्या घडामोडी
10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्ताने महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन- शरद म्हस्के

फलटण प्रतिनिधी- देशाच्या संविधान आणि आंतरराष्ट्रीय कायदाने आपल्याला अनेक अधिकार दीले आहेत. त्यात विशेष करून शिक्षण, वैद्यकीय, निवास, रोजगार, भोजन, समानता, स्वतंत्रता, शोषणाच्या विरोधी, धार्मिक स्वतंत्रता आणि जगण्याचा अधिकार प्रामुख्याने दिले गेले आहेत. परंतु स्वातंत्र्यानंतर आज पर्यंत आपल्या देशातील सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी देशांतील सामान्य, गोर गरीब जनतेला स्वतःच्या हक्काच्या मानव अधिकारा पासुन वंचीत ठेवले आहे. पुर्णपणे मानव अधिकाराचे व्यापार केला आहे. मानव अधिकाराला फक्तं निवडणूक प्रचाराचे साधन बनवून ठेवले आहे. मानव अधिकार संरक्षण समिती ( Human Right Protection Society ) संघटनेच्या वतीने सर्व नागरीकांना आपला हक्क मिळावा तसेच मानव अधिकाराचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मानव अधिकार संरक्षण समितीचे सचिव शरद म्हस्के यांनी केले.
यावेळी बोलताना पुढे मस्के म्हणाले की, अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष
मा श्री डॉ भगवान भाई दाठिया, महाराष्ट्र राज्य प्रचार प्रमुख गजानन भगत यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात व सामाजिक कार्य केले जात आहे. यात विशेष करून देशांतील विविध घटकांच्या जनते करिता आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारासाठी मार्गदर्शन, आंदोलन, देशभक्ती कार्यक्रम, शैक्षणिक, आरोग्य शिबिराचे आयोजन, गरीब गरजूंना वेळोवेळी मदत करणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे संघटने तर्फे वेळोवेळी आयोजन केलें जात असते असे सांगून मस्के म्हणतात आणि मानव अधिकाराचा लढा देऊन प्रत्येक गरजूंना त्यांचा हक्क मिळवून देण्याच्या कार्यास मानव अधिकार संरक्षण समितीच्या वतीने प्राधान्य दीले जाते .या महत्त्वपूर्ण कार्यात संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना कडून अशा कार्यात सहभागी होवून सहकार्य करण्याची अपेक्षा केली जाते. आणि संघटनेच्या अपेक्षेनुसार मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, सदस्य सर्व कार्यात सहभागी होवून उत्कृष्ठ प्रतिसाद देत आहे मानव अधिकारासाठी केल्या जाणाऱ्या जनहित, देशहित कार्यात अधिकाधिक नागरिकांचा सहकार्य मिळावे आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग लाभावा या उद्देशाने जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून मानव अधिकार संरक्षण समिती या आमच्या संघटनेचे सदस्यता अभियान सूरु करण्यात आले आहे. आपण सर्वांना संघटनेची सदस्यता घेवून मानव हक्काच्या कार्यात शामिल होण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी अनाथ आश्रमातील मुलांना तसेच मूकबधिर विद्यालयातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
तरी मानव अधिकार संरक्षण समितीची सदस्यता घेवून संघटनेच्या सामाजिक कार्यात सहयोग करावा असेही शेवटी म्हस्के म्हणाले.