फलटण प्रतिनिधी- मल्हार वधू वर संघटना व मल्हार लग्न भेट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिला दिनानिमित्त ऑनलाइन धनगर वधु- वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मल्हार लग्न भेट वधू वर सूचक मंडळाच्या सौ. कीर्ती रुपनवर यांनी दिली.
यावेळी बोलताना पुढे सौ. कीर्ती रुपनवर म्हणाल्या की, ऑनलाईन वधू-वर मेळाव्याच्या निमित्ताने घरबसल्या विविध स्थळे पाहण्याची या निमित्ताने सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यात आली असून सदरचा मेळावा रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी दुपारी ठीक ४ वा. आयोजित केला आहे.
या मेळाव्यासाठी दहावी१० वी व १२वी तसेच शेतकरी मुलींसाठी मोफत नोंदणी ठेवण्यात आली असल्याची ही माहिती यावेळी सौ. कीर्ती रुपनवर यांनी दिली आहे.
तरी सदरच्या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांनी आपली नाव नोंदणी 98 81 44 90 56 तसेच 70 20 81 66 09 या मोबाईल नंबर वर नोंदवावीत असे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.