फलटण प्रतिनिधी- युवा उद्योजक अधिराज करचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयांमध्ये दिव्यांग मुलांना खाऊचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

आजची युवा पिढी आपला वाढदिवस चौका चौकामध्ये भले मोठे केक कापून फटाके उडवून मोठमोठ्या पार्ट्या आयोजित करून आपला वाढदिवस साजरा करीत असतात
या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक अधिराज कर्चे यांनी समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित दिव्यांग बांधवांना खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे, सौ. हेमा गोडसे, सौ. विजया मठपती, उदय निकम, चैतन्य खरात व निर्मला चोरमले व आदिराज याचा मित्रपरिवार याप्रसंगी उपस्थित होता.
Back to top button
कॉपी करू नका.