फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – सस्तेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी युवा नेते दादासाहेब चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
दादासाहेब चव्हाण हे यापूर्वी सस्तेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी यशस्वी काम केले असून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांचे विश्वासू व कट्टर सहकारी आहेत.
दादासाहेब चव्हाण यांच्या निवडीबद्दल आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, फलटणची माजी आमदार दिपक चव्हाण इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Back to top button