फलटण प्रतिनिधी- नुकतीच लायन्स नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली या निवडणुकीमध्ये लायन शैलेंद्र शांतीलाल शहा यांची चेअरमन म्हणून तर द्वारकादास मोतीलाल भट्टड यांची व्हॉइस चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.तर माजी प्रांतपाल लायन राजेंद्र शहा व प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर यांची यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात लायन्स नागरी पतसंस्थेची निवडणूक लायन मंगेश दोशी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप गुंदेच्या, शैलेंद्र शहा, द्वारकादास भट्टड, सुहास निकम, विवेक गायकवाड, नितीन गांधी, राजकुमार मेहता, मंगेश दोशी, सौ. विद्या गांधी, सौ.गायत्री शहा, दादासाहेब शेंडे, दादासाहेब पिसाळ, संभाजी अडागळे हे १३ संचालक बिनविरोध निवडून आले होते.
ला. शैलेंद्र शहा व लायन द्वारकादास भट्टड यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.