ताज्या घडामोडी

खुंटे विकास सोसायटी ची वसुल पात्र कर्ज रक्कम 30 जून पूर्वी भरणा करा : अविनाश खलाटे

फलटण -आस्था टाईम्स वृत्तसवा : खुंटे विकास सेवा सोसायटी लि., खुंटे संस्थेच्या संचालक मंडळाने वसूल पात्र कर्ज रक्कम 30 जून अखेर वसूल करण्याचा निर्णय घेतला असून ज्या सभासदांनी वसूल पात्र कर्ज रक्कम अद्याप भरणा केली नाही त्यांनी आपली वसूल पात्र रक्कम दि. ३० जून पूर्वी संस्थेत भरणा करुन संस्थेस सहकार्य करावे अशी विनंती संस्थेचे चेअरमन अविनाश तथा काका खलाटे यांनी केली आहे.

खुंटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खुंटे या संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन अविनाश उर्फ काका खलाटे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन, जिल्हा बँकेचे अधिकारी, सचिव व सर्व संचालक मंडळ आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते.
संस्थेने आपल्या गोदामामध्ये संस्थेसाठी नवीन ऑफिस तयार केले आहे. त्यामध्ये सचिव व चेअरमन केबिन आणि संचालक मंडळाच्या मासिक बैठकीसाठी सभागृह तयार केले आहे, त्याचे उद्घाटन करण्यात आले.
माहे मार्च २०२२ पासून आज अखेर संस्थेच्या कामकाजाचा आलेख सतत चढता ठेवण्यात यश आले असून दि. ३१ मार्च २०२५ रोजी संस्थेचे सभासद १ हजार आहेत, त्यापैकी मयत व ब वर्ग सभासद संख्या जवळपास ३८० आहे. संस्थेचे कर्जदार सभासद ४२० असून त्यांच्याकडे येणे कर्ज रुपये ७ कोटी ७ लाख ८३ हजार २२९ रुपये एवढे आहे.
संस्थेचे भाग भांडवल दि. ३१ मार्च २०२२ रोजी ८२ लाख ७५ हजार ५९३ एवढे होते ते दि. ३१ मार्च २०२५ रोजी ९७ लाख २७ हजार ९०४ एवढे असून त्यामध्ये ९ लाख ५२ हजार ३११ ची वाढ झाली आहे. संस्थेच्या निधी दि. ३१ मार्च २०२२ रोजी ४३ लाख ७७ हजार ३३९ एवढा होता. गत तीन वर्षांमध्ये त्यामध्ये ४० लाख १८ हजार ८४८ ची वाढ होऊन दि.३१ मार्च २०२५ रोजी ८३ लाख ९६ हजार १८७ एवढा निधी झालेला आहे. सन २०२३ – २०२४ मध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संस्थेला फलटण तालुक्यातून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेचे खेळते भांडवल ९ कोटी १५ लाख आहे. संस्थेने गत ३ वर्षांमध्ये सन २०२१ – २०२२ – मध्ये १०% डिव्हीडंड व रेग्युलर कर्जदारांना पीक कर्ज मुद्दल रकमेवर अर्धा टक्का रिबेट दिले आहे. सन २०२२ – २०२३ मध्ये १४ % डिव्हिडंड व रेग्युलर कर्जदारांना पीक कर्ज मुद्दल रकमेवर १ टक्का रिबेट दिले आहे. सन २०२३ – २०२४ मध्ये १५% डिव्हिडंड वाटप केले आहे. संस्थेचा फिल्टर पाणी विभाग असून तो नफ्यामध्ये आहे. बँक पातळीवरील संस्थेच्या वसूल पात्र रकमेचा १०० टक्के वसूल झाला असून संस्था पातळीवरील वसूल पात्र रकमेची वसुली जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करीत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.