ताज्या घडामोडी
लायन्स क्लब संचलित माळजाई देवी उद्यान समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

फलटण प्रतिनिधी- ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारिते मधील दिपस्तंभ अरविंदभाई मेहता यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब संचलित श्री. माळजाई देवी उद्यान समितीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी माळ श्री माळजाई देवी परिसरामध्ये दहा फूट उंचीच्या पाम वृक्षाची २१ झाडे लावण्यात आली.


खजिनदार श्री.महेशशेठ गरवालीया, लायन्स हॉस्पिटलचे सचिव ला.श्री.चंद्रकांत कदम, ला.श्री.सुहास निकम,
सगुणामाता कन्स्ट्रक्शन फर्मचे संचालक ला. श्री. दिलीपराव शिंदे सर, श्री.प्रितम शिंदे, श्री.स्वीकार मेहता व श्री.विकास जाधव इतर मान्यंवर उपस्थित होते.


