ताज्या घडामोडी
महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी कुंकू व संगीत कार्यक्रमात महिलांनी सहभागी व्हावे – श्रीमंत शिवांजलीराजे ना. निंबाळकर

फलटण प्रतिनिधी- श्रीमंत सईबाई महाराज महिला पतसंस्था, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण व जायंटस ग्रुप ऑफ सहेली व राजे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी ठिक सायं. ५ ते ८ या वेळेत मुधोजी हायस्कूल जुनिअर कॉलेजच्या प्रांगणात फलटण तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकू व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या जेष्ठ सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे ना. निंबाळकर यांनी दिली आहे.



