फलटण प्रतिनिधी- बालविवाह, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरांची चौकट मोडून परिवर्तनवादी विचार समाजात रुजवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व नेत्ररोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विडणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कोल्हे, कोळकी ग्रामपंचायतचे उपसरपंच विकास शिंदे, पत्रकार विकास शिंदे, बापूसाहेब शिंदे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अक्षय गायकवाड, कोळकी ग्रामपंचायतचे सदस्य रमेश नाळे, कार्यकर्ते रणजीत भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते बापू भुजबळ इत्यादी मान्यंवर या प्रसंगी प्रसंगी उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.