फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आ. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर व आमदार दिपक चव्हाण यांच्या अथक प्रयत्नातून फलटण शहरातील विविध विकास कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
या विकास कामांना सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच सदरची कामे पूर्णत्वाला जाणार आहेत या विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक ९ मार्च रोजी सायंकाळी ठीक ६ ते ८ वा. दरम्यान होणार आहेत.
सोमवार पेठ येथे सायंकाळी ५.३०
सायंकाळी ६ वा प्रभाग क्रमांक ९ मधील शनिवार वाडा (सागर निकम) यांच्या घरासमोर, प्रभाग क्रमांक ११ पद्मावती नगर ६.१५ प्रभाग क्रमांक-१० अवस्थान मंदिर ६. ३० शिंदे रॅम ६.४५ प्रभाग क्रमांक ७ शुक्रवार पेठ गणपती मंदिर ७ वाजता ब्राह्मण गल्ली ७.१५ वा
मलटण ७.३० डी.एड.चौक ७.४५ गोळीबार मैदान पाण्याची टाकी ८ वा. वाजता हडको वसाहत ८.१५ वाजून पंधरा मिनिटे या ठिकाणी विकास कामांची भूमिपूजने आ. दिपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.