फलटण प्रतिनिधी- फलटण येथीलअनमोलरत्न ॲम्बुलन्सचे मालक अमोल रोमन यांचे रुग्णसेवेतील काम हे अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यांचे हे सेवाभावी काम पाहता रुग्णवाहिका दिनानिमित्त त्यांच्या विशेष सत्काराचे आयोजन सांगली येथे करण्यात आले होते.
सांगली येथे महाशक्ती महाराष्ट्र राज्य असोसिएशन ॲम्बुलन्स सेवा यांच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये अमोल रोमण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाशक्ती ॲम्बुलन्सचे अध्यक्ष शरद कात्रजकर, अर्जुन चव्हाण, योगेश मदने, विनायक माळी. रत्नागिरी टीम, लातूर टीम, रायगड टीम, सोलापूर टीम, सातारा टीम व तसेच पुणे, मुंबई इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते. अमोल रोमन वेळ पडली तर गरीब रुग्णांची सेवा मोफत करीत असतात कधीही त्यांना फोन केला तर तात्काळ सेवा देणारे म्हणून त्यांचा फलटण तालुक्यामध्ये नावलौकिक आहे. या सर्व कामाची दखल घेऊनच त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
अमोल रोमन यांच्या विशेष सत्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.