ताज्या घडामोडी
फलटण येथील पॉकेट कॅफे समोर श्रीसंत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फलटण प्रतिनिधी- संत गजानन महाराज यांचा १४६ वा प्रकट दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त शेगावमध्ये राज्यभरातून सातशेहून अधिक दिंड्यांचे आगमन झाले आहे. टाळ मृदंगाच्या गजराने शेगाव नगरी दुमदुमली आहे.याचाच एक भाग म्हणून फलटण येतील डी.एड. चौकातील पॉकेट कॅफे समोर श्रीसंत गजानन महाराज यांचे सुंदर पण छोटेसे मंदिर उभे करण्यात आले असून या मंदिराची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की, या ठिकाणी अशोक जोशी व मुधोजी हायस्कूलच्या शिक्षिका जोशी मॅडम या त्या ठिकाणी राहत होत्या त्यांच्या घरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून श्रीसंत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जात होता. ज्यावेळी सदरची जागा जोशी मॅडम यांनी राहुल भोई यांना विकत दिली त्यावेळी त्यांनी राहुल भोई यांना सांगितले होते की, या ठिकाणी श्रीसंत गजानन महाराज यांचे जागृत देवस्थान आहे. आम्ही आजपर्यंत त्यांची पूजाअर्चा आजपर्यंत करीत आलो आहोत. आपणही ती अशीच पुढे चालू ठेवावी असे राहुल भाऊ यांना सांगितले होते. या भावनेतून राहुल भोई आणि अजय शितोळे रावसाहेब यांनी या मंदिराची गेल्या दोन महिन्यापूर्वी पुनर्बांधणी व विधीवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती.
यानंतर आज या ठिकाणी राहुल भोई अजय शितोळे व त्यांच्या मित्रमंडळींच्या सहकार्यातून आज श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.





