ताज्या घडामोडी
दुधेबावी ता. फलटणमधे पार पडला अनोखा वृक्षारोपणाचा कार्यक्रम
श्री. भवानी माता डोंगर परिसरामध्ये देशी झाडांचे देशी झाडांचे करण्यात आले वृक्षारोपण

फलटण प्रतिनिधी- 1 जुलै जागतिक डॉक्टर्स दिवसाचे औचित्य साधून भवानी माता मंदीर परिसर, दुधेबावी, ता.फलटण.जि.सातारा येथे नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी,फलटण यांच्या विद्यमाने डोंगर परिसरात स्थानिक देशी झाडांचे वृक्षारोपण इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स, फलटण डॉक्टर्स असोसिएशन, व आकांशा क्लासेस फलटणचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच वृक्षमित्र सचिन सोनवलकर यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आले.




