ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासनाच्या नगररचना प्रमुखपदी सुनील मरळे यांना पदोन्नती

नगररचना विभागात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुनील मरळे यांची ओळख

पुणे-प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या नगररचना सहसंचालक पदावर कार्यरत असलेले श्री. सुनील पुंडलिक मरळे यांची महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागात संचालक या पदावर पदोन्नती झाली आहे. संचालक हे पद महाराष्ट्र राज्याच्या नगररचना (टाऊन प्लानिंग) विभागाचे राज्याचे प्रमुखपद आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुनील मरळे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून शासनाच्या नगरविकास विभागात वेगवेगळी धोरणे ठरविण्यामध्ये मोठा सहभाग आहे. त्यामुळे मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन वेळा उत्कृष्ट अधिकारी म्हणून पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव झाला आहे.

सन १९९४ मध्ये MPSC मार्फत सहायक नगररचनाकार (क्लास 2) या पदावर रत्नागिरी येथे प्रथम नोकरीत प्रवेश केला होता. पुन्हा सन २००० मध्ये नगररचनाकार (क्लास १) म्हणून MPSC कडून निवड झाली होती. सुनील मरळे हे अतिशय हुशार असल्याने सन २००८ सहायक संचालक, नगररचना ( सुपर क्लास १ )म्हणून MPSC कडून निवड झाली.
१९९४ ते आजपर्यंत त्यांनी सातारा जिल्हा नगररचना विभाग प्रमुख, मंत्रालयात नगर विकास विभागात अवर सचिव म्हणून काम केले. २०१५ मध्ये उपसंचालक पदावर पदोन्नती झाल्याने २०१५ ते २०२१ पुणे येथे सेंट्रल बिल्डिंग मधील नगररचना विभागाच्या मुख्य कार्यालयात काम केले. २०२१ मध्ये सहसंचालक पदावर पदोन्नती झाल्यामुळे २०२१ – २२ मध्ये पुणे मनपा येथे व सन २०२२-२३ मध्ये पुन्हा मंत्रालय नगरविकास विभागात सहसचिव (जॉईंट सेक्रेटरी ) म्हणून काम केले. जानेवारी २०२३ पासून PMRDA येथे कार्यरत होते. ३० जूनला संचालक नगररचना महाराष्ट्र पदावर पदोन्नती झाली असली तरी तूर्तास त्यांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) येथे पोस्टिंग देण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.