ताज्या घडामोडी

लायन्स क्लब फलटण, लायन्स मुधोजी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर व चहा, बिस्कीट पुढ्यांचे वाटप

लायन जगदीश करवा, लायन अर्जुन घाडगे यांची माहिती

फलटण प्रतिनिधी- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी लायन्स क्लब ऑफ फलटण व लायन्स मुधोजी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांना चहा, मिनरल वॉटर व बिस्किट पुडे यांचे वाटप करण्यात आले.

तसेच लायन्स क्लब ऑफ फलटण संचालित लायन्स मुधोजी चारिटेबल आय हॉस्पिटल मार्फत वारकऱ्यांच्या किरकोळ आजारपणावर जवळजवळ दिड हजार वारकऱ्यांची मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली.

या सेवेसाठी लायन्स हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व त्यांची टीम तसेच नेहमीच वैद्यकीय सेवा कार्य करणारे डॉ. श्वेता दळवी, डॉ. संपतराव नलावडे, डॉ. अतुल दोशी गुणेवरेकर, डॉ. विक्रांत रसाळ, डॉ. दिव्या रसाळ, डॉ. विश्वराज निकम व त्यांची टीम या सर्वांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

तसेच लायन्स क्लब ऑफ फलटण व रानडे पेट्रोल पंपाचे मालक हेमंत रानडे यांचे संयुक्त विद्यमाने देवव्रत (राणा) वास्कर महाराज वारकरी दिंडी करीता आळंदी ते पंढरपूर मोफत पिण्याचे पाणी वापराचा १० हजार लिटर क्षमतेचा टँकर सेवेसाठी देण्यात आलेला आहे.


वरील सर्व सेवाकार्याचे नियोजन सन २०२५-२५ लायनेस्टीक वर्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायन जगदीश करवा, सेक्रेटरी लायन महेश साळुंखे व खजिनदार लायन रणजीत बर्गे यांनी उत्तम प्रकारे पाडले असून,

या सेवाकार्यास लायन्स क्लब मल्टिपल 3234D1 व्हॉइस कौन्सिल चेअरपर्सन पीएमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर, माजी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजीव नाईक निंबाळकर, माजी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटर एमजेएफ लायन मंगेश दोशी, माजी डिस्ट्रिक्ट खजिनदार एडवोकेट शैलेंद्र शहा, डिस्ट्रिक्ट लायन्स क्वेस्ट चेअरपर्सन लायन सुहास निकम,

झोन चेअरमन लायन विजयकुमार लोंढे पाटील, लायन्स हॉस्पिटलचे चेअरमन लायन अर्जुन घाडगे, सेक्रेटरी लायन चंद्रकांत कदम, लायन रणजित निंबाळकर, लायन दिलीप गुंदेच्या, लायन रविकांत इंगवले, डॉ. लायन ऋषिकेश राजवैद्य, लायन सुशील अग्रवाल, लायन नितीन गांधी, लायन प्रसन्न कुलकर्णी, लायन बाळासाहेब भोंगळे, लायन राजीव शहा, यांनी सेवा कार्यास मोलाची मदत केली.

त्याबद्दल नवनिर्वाचित लायन्स क्लब फलटण चे अध्यक्ष लायन जगदीश करवा यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच या सेवा कार्यास विशेष करून प्रांताचे माजी प्रांतपाल एमजेएफ लायन विजयकुमार राठी, प्रांताच्या हंगर ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन एमजेएफ लायन नीलम लोंढे पाटील हे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे लायन्स क्लब फलटण च्या वतीने आभार मानून यथोचित सत्कार करण्यात आला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.