फलटण प्रतिनिधी- फलटण येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रांती सूर्यप्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या वतीने अनेक ठिकाणी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था फलटण शाखा उमाजी नाईक चौक फलटण, लोकमान्य नर्सिंग होम, व फलटण मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
या ठिकाणी लागणारी सर्व औषधे ही क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आली आहेत.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठान नेहमी सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये हिरारीने भाग घेऊन काम करणारी संस्था म्हणून सर्वत्र परिचित आहे.
आज पर्यंत क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले गेले आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल नेहमीच व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.