ताज्या घडामोडी
खासदार क्रिडा महोत्सव खो खो स्पर्धा मुलींचे विजेतेपद शिवनेरीला तर पुरुषांचे विजेतेपद विद्यार्थीला शिवनेरीच्या सिद्धी शिंदे व विद्यार्थीच्या जनार्धन सावंतची चमकदार कामगिरी

(मुंबई/प्रतिनिधी)- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा विभागातर्फे आयोजित खेळ महोत्सवातील खो खो स्पर्धा भवानी माता क्रीडांगण, दादासाहेब फाळके मार्ग, शिंदेवाडी, दादर (पूर्व), मुंबई येथे संपन्न झाली असून या स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने श्री समर्थ व्यायाम मंदीराचा पराभव करत तर मुलींच्या अंतिम सामन्यात शिवनेरी सेवा मंडळ (अ) संघाने ओम साईश्वर सेवा मंडळाचा पराभव करत अंतिम विजेतेपद मिळवले.
१७ वर्षाखालील मुली गटाच्या अंतिम सामन्यात अतिशय चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. शिवनेरी सेवा मंडळ (अ) संघाने ओम साईश्वर सेवा मंडळाचा (२-२-४-४–३-३-१-१) १०-१० असे समान गुण असता लघुत्तम आक्रमणाने १:३९ मिनिटे राखून पराभव केला. शिवनेरी (अ) संघातर्फे मुस्कान शेखने नाबाद १:१०, ३:२०, ४:३० असे संरक्षण केले. सिद्धी शिंदेने ४:२०, ३:३०, १:३० मिनिटे संरक्षण करुन आक्रमाणात २ खेळाडू बाद केले. आरुषी गुप्ताने ३:३०, १:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद करत विजयश्री अक्षरश: खेचून आणली. तर उपविजेत्या ओमसाईश्वरतर्फे यशस्वी कदमने नाबाद २:२०, २:३० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ४ खेळाडू बाद केले. कादंबरी तेरवणकरने ४:५०, ४:५०, ३:२० लघूत्तम आक्रमणात २:०७ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. निर्मिती सावंतने १:५०, १:३०, १:३० मिनिटे संरक्षण करताना कडवी लढत दिली मात्र त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने श्री समर्थ व्यायाम मंदीराचा १४-१३ (५-७-९-६) असा १ गुणाने पराभव केला. या सामन्यात समर्थने मध्यंतराला ७-५ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती पण हि आघाडी मोडून काढत विद्यार्थीने विजय खेचून घेऊन गेले. विद्यार्थीतर्फे जनार्धन सावंतने २:२०, १:०० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ३ गडी बाद केले. प्रतिक घाणेकरने १:१०, २:२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. भावेश बनेने आक्रमणात ३ गडी बाद केले तर उपविजेत्या श्री समर्थतर्फे वेदांत देसाई २:१०, २:२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ३ गडी बाद केले. पियुष घोलमने नाबाद १:४०, २:०० मिनिटे संरक्षण करुन आक्रमाणात ३ गडी बाद केले. विशाल खाकेने १:१०, २:०० मिनिटे संरक्षण केले.