फलटण प्रतिनिधी- श्री. संतज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण वरून पुढे मार्गस्थ होत असतो हे फलटणकरांचे भाग्य आहे. फलटण येथून पुढे पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना बराच मोठा समाज सोबत असल्याने बराचसा कचरा त्या ठिकाणी निर्माण होत असतो. तो कचरा स्वच्छ करण्याच्या मोहिमेत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल एस.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या स्वच्छता मोहिमेला हातभार लावला.

या स्वच्छता मोहिमेची सुरुवात फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल एसएससीच्या प्राचार्य सौ. फाळके मॅडम व त्यांचे सर्व शिक्षक पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की; काल पुणे विद्यापीठांमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी फलटण पालखीत स्वच्छता मोहीम केली होती. त्यांनी सुद्धा अत्यंत चांगले काम केलेले आहे. यांच्यासोबतच फलटण मधील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल एसएससी यांच्यासह बहुतांश शाळांमधील मुले व मुली पालखीतळ स्वच्छतेचे काम करत असतात. स्वच्छता व सेवाभावी बद्दलचा संदेश कायमस्वरूपी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या मनामध्ये कोरला जावा; यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
मोठा समाज सोबत असल्याने बराचसा कचरा त्या ठिकाणी निर्माण होत असतो. तो कचरा स्वच्छ करण्याच्या मोहिमेत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल एस.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या स्वच्छता मोहिमेला हातभार लावला.
या स्वच्छता मोहिमेची सुरुवात फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल एसएससीच्या प्राचार्य सौ. फाळके मॅडम व त्यांचे सर्व शिक्षक पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की; काल पुणे विद्यापीठांमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी फलटण पालखीत स्वच्छता मोहीम केली होती. त्यांनी सुद्धा अत्यंत चांगले काम केलेले आहे. यांच्यासोबतच फलटण मधील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल एसएससी यांच्यासह बहुतांश शाळांमधील मुले व मुली पालखीतळ स्वच्छतेचे काम करत असतात. स्वच्छता व सेवाभावी बद्दलचा संदेश कायमस्वरूपी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या मनामध्ये कोरला जावा; यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
Back to top button
कॉपी करू नका.