फलटण प्रतिनिधी- फलटण लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माजी फलटण लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. ही केलेली निवड मी सार्थ ठरवून फलटण लायन्स क्लबच्या माध्यमातून मी व माझी टीम लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डि-१ यांनी दिलेल्या मयूर ॲक्शन प्लॅन प्रमाणे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करणार असून विशेष करून लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन कडून अंधत्व निवारण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन फलटण लायन्स क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष लायन जगदीश करवा यांनी केले.
फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालय येथे लायन्स क्लब फलटणच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी लायन जगदीश करवा बोलत होते.
यावेळी बोलताना लायन जगदीश करवा म्हणाले की, फलटणची विशेष करून ओळख असणारा कायमस्वरूपी प्रकल्प लायन्स मुधोजी चारिटेबल आय हॉस्पिटल यासाठी मिळालेले १ कोटी १६ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक २१ अत्याधुनिक इक्विपमेंट नुकतीच हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल केलेली आहेत.
या अत्याधुनिक सुविधांचा जास्तीत जास्त लाभ फलटण माण, कोरेगाव खंडाळा खटाव इंदापूर माळशिरस बारामती या कार्यक्षेत्रातील गावोगावी जाऊन मोफत नेत्र तपासणी करून लायस क्लब फलटणची समाज ओळख करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने करणार असून माझ्या मालकीची फरांदवाडी येथील स्वरा सिटी मधील आपल्या लायन्स हॉस्पिटललाच लागून असलेली १० हजार चौरस फुटाची भूखंड ऑप्टोमेट्रीस्ट हा २ वर्षाचा कोर्स कार्य शाळेसाठी व इतर सेवा कार्यासाठी बक्षीस देण्याचे ठरवले आहे.
या कार्यशाळा मधून अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी कोर्स करून फलटणमधील ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचून व त्यांचा सर्वे करून लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या अंधत्व निवारणासाठी आपण सर्व लायन्स सदस्य जोमाने सेवा करूया यासाठी विशेष करून लायन्स मुधोजी लायन्स आय हॉस्पिटलचे चेअरमन लायन अर्जुन घाडगे व त्यांच्या टीम कडून मदतीची अपेक्षा करतो.
अशीही शेवटी लायन जगदीश करवा म्हणाले. यावेळी लायन्स क्लबच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पदग्रहण अधिकारी एम जे एफ लायन डॉक्टर राजेंद्र शहा यांनी शपथ दिली.
नूतन सदस्य शपथ दाते पी एम जे एफ माजी प्रांतपाल ला. भोजराज नाईक निंबाळकर, रिजन चेअरमन लायन दिलीप वहाळकर, झोन चेअरमन लायन विजयकुमार लोंढे पाटील, हंगर ऍक्टिव्हिटी चेअरमन एम जे एफ लायन नीलम लोंढे पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता, रवींद्र बेडकीहाळ, सातारा क्लबचे माजी रिजन चेअरमन बाळासाहेब शिरकांडे, नरेंद्र रोकडे, लायन रंणजीत निंबाळकर, डॉक्टर जे. टी. पोळ
बाळकृष्ण जाधव, माजी झोन चेअरमन अनिल कदम, माजी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजीव नाईक निंबाळकर, माजी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटर एम जे एफ लायन मंगेश दोशी, माजी डिस्ट्रिक्ट खजिनदार एडवोकेट शैलेंद्र शहा, डिस्ट्रिक्ट लायन्स क्वेस्ट चेअरपर्सन लायन सुहास निकम, लायन्स हॉस्पिटलचे चेअरमन लायन अर्जुन घाडगे, सेक्रेटरी लायन चंद्रकांत कदम लायन दिलीप गुंदेच्या, लायन डॉक्टर ऋषिकेश राजवैद्य,
लायन सुशील अग्रवाल, लायन नितीन गांधी, लायन प्रसन्न कुलकर्णी, लायन बाळासाहेब भोंगळे, लायन डॉक्टर अशोक व्होरा तसेच लायन्स क्लब फलटण लायन्स क्लब फलटण गोल्डन लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम या क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.