लोणंद प्रतिनिधी -श्री. दत्त मंदिर संस्थान मोरवे तालुका खंडाळा येथे २७ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबिर होणार असून नामवंत डॉक्टर रुग्णांची तपासणी व औषधोपचार करणार आहेत. तरी इच्छुक भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य सद्गुरु ज्ञानोबा विश्वनाथ हिंगमिरे तथा देव यांच्या २८ नोव्हेंबर जन्मदिनांक औचित्य साधून हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सद्गुरू ज्ञानोबा विश्वनाथ हिंगमिरे देव यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा दिनांक २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. दिनांक २६ रोजी सकाळी ८ वाजता नवनाथ ग्रंथ पारायण प्रारंभ तसेच योगी माधवनाथजी महाराज (गोरखपूर ,उत्तर प्रदेश ) यांच्या अधिपत्याखाली *गुरु गोरक्षनाथ गायत्री यज्ञ* विधी प्रारंभ .दिनांक २७ रोजी सर्व रोगनिदान शिबिर व मोफत डोळे तपासणी प्रारंभ १० वाजता. व इतर धार्मिक कार्यक्रम दिनांक २८ रोजी सकाळी ६ वाजता श्रीदत्त प्रभू व सद्गुरु चिले महाराज मूर्तीस लघुरुद्राभिषेक सकाळी ८ वाजता यज्ञ आहुती व यज्ञ सांगता सकाळी १० वाजता नवनाथ पारायण सोहळा समाप्ती.दुपारी १२ वाजता महाआरती दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत सद्गुरु देवांना ५२ पात्री महाभिषेक व देवांची तुळा होणार आहे त्यानंतर अभिष्टचिंतन, भजन सोहळा व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री. दत्त मंदिर संस्थान तर्फे करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.