फलटण प्रतिनिधी – पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या दि.०७/०५/२०२५ रोजी महत्त्वाच्या शहरामध्ये हवाई दलाची युद्ध मॉक ड्रिल होणार असून हे युद्ध नसून हा युद्धपूर्वीचा सराव आहे. अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी दिली आहे.
याबाबतचे अधिक माहिती देताना शहा म्हणाले की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व यावर कोणी अफवा पसरवू नये. वेळेस काही विमाने आपल्या शहरांवरून अथवा जवळून गेल्यास आपण घाबरून जाऊ नये.
प्रशासन वेळोवेळी ज्या सूचना देतील त्या सूचनाप्रमाणे पालन करावे असे ही शेवटी हेमंत कुमार शहा म्हणाले आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.