ताज्या घडामोडी

श्रीमंत दगडीचाळ गणेशोत्सव मंडळ अहवाल पूजन श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या शुभहस्ते

फलटण प्रतिनिधी- साला बादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्स साजरा करण्यासाठी फलटण येथील श्रीमंत दगडीचाळ गणेशोत्सव मंडळाचा सन- २०२४ चा अहवाल व पावती पुस्तक पुजन कार्यक्रम फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते मा.श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला.

यावेळी श्रीमंत दगडीचाळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार व सेक्रेटरी तसेच सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीमंत दगडीचाळ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने  मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकारी दिली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.