ताज्या घडामोडी

सुरज यादव मित्र मंडळाची रौप्यमहोत्सवी दहीहंडी २७ रोजी संपन्न होणार

फलटण प्रतिनिधी- फलटण शहरात मानाची म्हणून ओळखली जाणारी सुरज यादव मित्र मंडळाची दहीहंडी यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. हि मानाची दहीहंडी महोत्सव मंगळवार दिनांक २७/८/२०२४ रोजी महावीर स्तंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होणार असल्याची माहिती सूरज यादव मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष फलटण कोरेगावचे आ. दिपक चव्हाण तर प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अध्यक्ष डॉ. विजयराव बोरावके हे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटक म्हणून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे ना. निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे ना. निंबाळकर श्रीमंत सत्यजितराजे ना.निंबाळकर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास तरुण मंडळांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुरज यादव मित्र मंडळाचे अध्यक्ष रणजीत भुजबळ यांनी दिली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.