डोंगरगाव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे UPL(Advanta) कंपनी लिमिटेड यांच्यावतीने शाळेतील मैदानावर ४ लाख रक्कमेचे पेविंग ब्लॉक बसविण्यात आले होते. या कामाचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हि करण्यात आले.
या मंगलमय प्रसंगी UPL कंपनीचे सर्व पदाधिकारी व सर्व अधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहून सदिच्छा दिल्या.
त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन केले साले शालेय जीवनात असणारे शिस्तीचे महत्व सांगितले या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ.अलका साकोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बेंद्रे मॅडम यांनी केले.
Back to top button
कॉपी करू नका.