ताज्या घडामोडी

बक्षीसपात्र स्थानकाबरोबर इतर बस स्थानकांनी प्रवाशांना सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करावा – श्रीनिवास जोशी : फलटण आगार १० लाखाचे बक्षीस

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान पुणे विभागात फलटण आगारास प्रथम क्रमांक

फलटण प्रतिनिधी- स्वच्छ बस स्थानक अभियाना बरोबरच प्रवाशांना इतर सर्व सोयीसुविधा पुरविण्यासाठी फलटण आगारांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांच्या पाऊलावर  पाऊल ठेवून सर्व बक्षीस बस स्थानकाबरोबर इतर बस स्थानकांनी प्रवाशांच्या सोयी-सुविधा  देण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्य परिवहन प्रादेशिक व्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांनी केले.

हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेतील विजेत्या बसस्थानकास बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात श्रीनिवास जोशी बोलत होते.

यावेळी प्रादेशिक व्यवस्थापिका श्रीमती यामिनी जोशी, फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला, विभाग नियंत्रक श्री. रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधीक्षक तथा कामगार अधिकारी श्रीमती रेश्मा गाडेकर मॅडम, तत्कालीन प्रभारी आगार व्यवस्थापक व सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री. रोहित नाईक , वरिष्ठ लिपिक श्री. कुलदीप चव्हाण
ही तुझी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते .
यावेळी बोलताना पुढे श्रीनिवास जोशी म्हणाले की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान संपूर्ण राज्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यात असून या अभियानात अंतर्गत स्वच्छ व सुंदर बस स्थानक त्याचबरोबर प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा या उपक्रमाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी फलटण बस स्थानकास दहा लाख रुपयाचा धनादेश, प्रशस्तीपत्रक व चषक देऊन गौरविण्यात आले.
फलटण आगारात चषक व धनादेशाची प्रतिकृती आल्यानंतर फलटण आगारातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनी, पर्यवेक्षक यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला व सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्री. रोहित नाईक यांनी फलटण आगारातील सर्व चालक, वाहक , यांत्रिक , पर्यवेक्षक , प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे व सर्व प्रायोजक यांच्यामुळे फलटण आगारास सदर अभियानात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन करता आल्याचे नमूद केले. तसेच हे अभियान इथे संपत नसून “अंत: अस्थि प्रारंभ:” या उक्तीनुसार हीच खऱ्या अर्थाने स्वच्छतेच्या अभियानाची सुरुवात असल्याचे श्री. नाईक यांनी प्राधान्याने नमूद करत भावी वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानक प्रमुख श्री. राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक श्री. सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री.धिरज अहिवळे, लहू चोरमले, श्रीपाल जैन, श्री. सुखदेव अहिवळे व बहुसंख्य कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.