ताज्या घडामोडी

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन निंबाळकर तर उपाध्यक्षपदी संजय जामदार यांची बिनविरोध निवड

फलटण : फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आदर्की खुर्द ता. फलटण येथील साप्ताहिक स्वराज अ‍ॅग्रोचे कार्यकारी संपादक सचिन निंबाळकर यांची, उपाध्यक्ष पदी कोळकी ता. फलटण येथील दैनिक सकाळ पत्रकार संजय जामदार यांची तर सचिवपदी आसू ता. फलटण येथील दैनिक सकाळ पत्रकार अशोक सस्ते यांची एकमताने निवड करण्यात आली.

शनिवार दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता माळजाई मंदिर फलटण येथे फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक झाली. बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आल्या. फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ पदाधिकारी निवडीवेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, सातारा जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य मुगुटराव कदम, माजी अध्यक्ष शशीकांत सोनवलकर, अशोक सस्ते, संजय जामदार, सचिन निंबाळकर, सुभाष सोनवलकर, आनंद पवार यांची उपस्थिती होती.
बैठकीत शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय, पुणे विभागीय व जिल्हास्तरीय पुरस्काराबाबत चर्चा करण्यात आली.
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांची एकजूट आणि त्यांच्या सहकार्याने संघटनेच्या विविध उपक्रमांची पुढील वाटचाल अविरत सुरु ठेवण्यास आपण सर्व सदस्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने आपण सर्वजण संघटनेचे विविध उपक्रम मोठ्या जोमाने सुरु ठेवाल असा विश्‍वास संघटनेचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार यांनी व्यक्त केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.